यशोगाथा शाळेची
ध्यास नव्या पर्वाचा …
कोरोना काळातही शिकण्या शिकविण्याचा !
ताराराणी
विद्यापीठाचे,
उषाराजे हायस्कूल,
कोल्हापूर.
2020-2021
नमस्कार,
शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षण शब्दाचा
खरा अर्थ समजावून
घेऊन तो विचार
ज्या ज्या ठिकाणी
माणसाचा सहभाग आहे. अशा
प्रत्येक क्षेत्रात प्रवर्तित केला
तर हे जग
इथे राहण्यासाठी सर्वोत्तम
जागा बनेल, असा
विचार भारताचे दिवंगत
राष्ट्रपती डॉ. ए.
पी. जे. अब्दुल
कलाम यांनी व्यक्त
केला आहे.
डॉ. कलाम यांच्या
प्रत्येक स्वप्नाला शिक्षणाचा स्पर्श
होता, आणि
म्हणूनच सन 2020 मध्ये आपला
भारत देश महासत्ता
बनेल या आश्वासक
प्रेरणेने संपूर्ण देशबांधव भारावले
गेले होते. याच वेळी
देशातच नव्हे तर संपूर्ण
जगभरात एका जैविक
महामारीने थैमान
घातले. कोरोना विषाणूची साथ
हे दुसऱ्या महायुद्धानंतर
जगासमोर एक मोठे
संकट होते . याचा
सर्वसामान्यांपासून ते उच्चवर्णीया पर्यंत समाजातल्या
प्रत्येक घटकावर परिणाम दिसून
आला.
आज जेव्हा
कोरोना विषाणूने आपण “गृहीत
धरलेले जग” हादरवून
टाकले आहे आणि
व्यापक प्रमाणावर मानसिक चिंता
व अस्तित्वाचीच अनिश्चितता
निर्माण केली आहे
अशा महत्वपूर्ण टप्प्यावर
शिक्षण क्षेत्रातही प्रचंड उलथापालथ
घडली .शिक्षण क्षेत्रही
याला अपवाद नव्हते .शैक्षणिक
वर्ष 2020-21 ची सुरुवात
व संपूर्ण
वर्षभरातील कालावधीत समाजातील अन्य
घटकांबरोबर विद्यार्थी, पालक, व
शिक्षक यांना ही प्रचंड
ताण तणावाला सामोरे
जावे लागत आहे.
परंतु म्हणतात
ना ,
“ कुछ किये
बिना जय जयकार
नही होती,
कुछ किये
बिना जय जयकार
नही होती ,
कोशिश करने वालों
की हार नही
होती “
या उक्तीप्रमाणे
महिला शिक्षण व सबलीकरणाचा वसा आणि
वारसा घेतलेल्या ताराराणी विद्यापीठ, उषाराजे हायस्कूल मध्ये शिक्षणाला तंत्रज्ञानाची
व समाज
माध्यमांची जोड देऊन
मुलींच्या शिक्षणाची अखंडता टिकवून
ठेवली जगण्याची
सूक्ष्म कला शिकवणारे
शिक्षण म्हणजे अर्थपूर्ण शिक्षण याची
अनुभूती देत नव्या
माध्यमातून, नव्या प्रेरणेतून तंत्रस्नेहीअध्यापकांच्या पुढाकाराने कोरोनाच्या या कालावधीतही
शिक्षणाच्या प्रवाहात नव्या विचारांची
रुजवणूक सुरू ठेवली.
शिक्षण देण्याचे व घेण्याचे नवे रंग आत्मसात करत प्रवेश प्रक्रियेपासून ऑनलाईन तास , ऑनलाईन परीक्षा घेताना विद्यार्थिनी व पालकांच्या शाळा व शिकणे बंद आहे या भीतीला समूळ नष्ट करून त्यांच्यात शाळेविषयी, संस्थेविषयी एक विश्वास निर्माण करण्याचे अभिमानास्पद कार्य जाणीवपूर्वक केले गेले.
डॉ. क्रांतीकुमार पाटील
याकरिता ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉ. क्रांतीकुमार पाटील, संस्थेचे
सचिव मा .प्राजक्त पाटील, संस्थेचे सन्माननीय विश्वस्त
,शाळा व्यवस्थापन समितीचे
सदस्य ,शाळेचे सर्व पदाधिकारी
यांचे प्रोत्साहन प्रेरणा
व मार्गदर्शन लाभले.
लॉकडाउनच्या काळात शाळा सुरू करत असताना शाळा बंद पण शिक्षण सुरू या दृष्टीकोनातून एप्रिल २०२० पासून नव्या २०२१ या शैक्षणिक वर्षाचे नियोजन सुरू झाले व त्याची सुरुवात झाली ती म्हणजे मिशन ऍडमिशन अर्थात ऑनलाइन एडमिशन संस्थेच्या परवानगीने शाळेची ॲडमिशन लिंक ओपन करण्यात आली .यासाठी तंत्रस्नेही अध्यापक बांधव श्री. एस .एस. पाटील व श्री. व्ही. एन .पाटील यांनी तंत्रस्नेही मार्गदर्शिका व शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ ए. यु साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ऍडमिशन लिंक तयार केली व प्रत्येक वर्गाच्या ,शिक्षक पालक संघाच्या, व महाविद्यालयाच्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठवली. याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला व मिशन ऍडमिशन यशस्वी झाले.
मुख्याध्यापिका सौ. ए. यु. साठे
ऍडमिशन झाल्यावर मराठी व सेमी माध्यमाच्या वर्गांचे नियोजन जून अखेरीस पूर्ण करून ऑनलाइन तासांचे नियोजन केले .शाळा ऑफलाइन सुरू नाही पण अध्ययन-अध्यापन ऑनलाइन पद्धतीने सुरु करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संपर्क समितीच्या सभासदांची सोशल डिस्टंसिंग चे पालन करून सभा आयोजित करण्यात आली .त्यांच्या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणी नंतर पुढील कार्यवाहीस सुरुवात झाली .
प्रत्येक वर्गाचे विद्यार्थी, पालक, शिक्षक पर्यवेक्षक, यांची ऑनलाइन सभा आयोजित करून त्यांना शालेय कामकाजाच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली व त्यांच्या सकारात्मक प्रतिसादासाठी त्यांचे समुपदेशनही केले माहिती तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचा विस्तार, दर्जा ,विकास ,होण्यास भरपूर वाव आहे ही बाब लक्षात घेऊन झूम,
गुगल मिट या नव्या तंत्रज्ञाना बरोबरच युट्युब, मल्टीमीडिया ,मोबाइल फोन, दूरदर्शन ,या माध्यमातून यशस्वी अध्ययन अध्यापनात वेग प्राप्त झाला
तसेच इ साहित्याचा वापर ,लिंक किंवा व्हिडिओ शेअर करणे, दीक्षा ॲप डाऊनलोड करणे त्याचा योग्य पद्धतीने वापर
करणे, गुगल मिट द्वारे मिटींगला जॉईन होणे
यासारख्या बारीकसारीक गोष्टीही विद्यार्थी व पालकांना समजावून सांगण्यात आल्या
ऑनलाइन अध्ययन-अध्यापन काळात अभ्यासाबरोबरच विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याकरता विविध स्पर्धांचे आयोजन केले . स्पर्धा विभाग प्रमुख सौ योगिनी भोसले यांनी थँक्स टीचर ,माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत अनेक स्पर्धांचे आयोजन केले .शालेय व शालाबाह्य स्तरावर वक्तृत्व स्पर्धा, नाट्य वाचन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,घोषवाक्य ,निबंध ,पोस्टर स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला व त्याचबरोबर भरघोस यश संपादन केले.
ऑनलाइन अध्ययन-अध्यापन काळात अभ्यासाबरोबरच विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याकरता विविध स्पर्धांचे आयोजन केले . स्पर्धा विभाग प्रमुख सौ योगिनी भोसले यांनी थँक्स टीचर ,माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत अनेक स्पर्धांचे आयोजन केले .शालेय व शालाबाह्य स्तरावर वक्तृत्व स्पर्धा, नाट्य वाचन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,घोषवाक्य ,निबंध ,पोस्टर स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला व त्याचबरोबर भरघोस यश संपादन केले.
ऑनलाइन
अध्ययन
अध्यापन
सुरू
असताना
विविध
उपक्रम
करण्यात
नेहमीच
अग्रेसर
असणाऱ्या
उषाराजे
हायस्कूल
च्या
सहाय्यक
शिक्षिका सौ व्ही
एस.मस्के यांनी राबवलेला
शिक्षक
आपल्या
दारी
हा
उपक्रम
कोरोनाच्या
संकट
काळात
सरनोबतवाडी
परिसरातील विद्यार्थिनींसाठी
यांचे
शैक्षणिक
हित
जपणारा
ठरला.
सौ मस्के
यांनी
याच
काळामध्ये
एन
सी
सी
च्या
विद्यार्थिनींना मास्क
बनवण्याचे
प्रशिक्षण
दिले
या
कार्यात
पालकांचे बहुमोल
सहकार्य
सहकार्य
त्यांना
लाभले.
त्यानंतर
समाजातील गरजू व्यक्तींना उषाराजे हायस्कूल
एन.सी.सी विभागामार्फत मास्क चे वाटप करण्यात आले.
शाळेतील अनेक अध्यापकांनी तंत्रस्नेही बनत यूट्यूब चैनल वर आपले शैक्षणिक
व्हिडिओ उपलब्ध करून दिले त्यामध्ये प्रामुख्याने
श्री. एस .पी. वातकर सौ. व्ही. एस. मस्के तसेच सौ. एन. एम. जाधव यांनी या शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थिनींचे
अध्ययन अधिक सुलभ करण्याचे यशस्वी प्रयत्न
केले.
तसेच मुख्याध्यापक संघ विद्याभवन ऑनलाईन शिक्षण शिक्षण आपल्या दारी या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवला गेलेला कोल्हापूर विभागातील उपक्रम, या उपक्रमांमध्ये शाळेतील सहाय्यक शिक्षक श्री ए पी बने यांनी गणित भाग 2, श्री एस पी वातकर यानी गणित भाग 1 ,तर सौ एस . डी .चव्हाण यांनी इतिहास व राज्यशास्त्र या विषया करता तज्ञ मार्गदर्शक म्हणून आपले बहुमोल योगदान दिले.
सौ
एस. पी .पाटील यांनी स्वतः गुगल फॉर्म चा वापर करून प्रश्नपत्रिका तयार केल्या व विद्यार्थिनी पर्यंत पोहोचवल्या विद्यार्थ्यांनी त्याला भरघोस प्रतिसाद दिला व यामुळेच त्यांनी स्वतः यूट्यूब चैनल वरती आपला गुगल फॉर्म वापरून प्रश्नपत्रिका कशी तयार करावी या संदर्भातील व्हिडिओ तयार केला व या व्हिडिओच्या माध्यमातून व प्रत्यक्ष सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले याला सर्व शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला व आपल्या वर्गांसाठी प्रश्नपत्रिका तयार केल्या.
शाळेने
सुरू केलेल्या ऑनलाइन तासा मध्ये अत्याधुनिक साधनांचा जास्तीत जास्त वापर करून मे 2020 पासून ऑनलाइन तासांना सुरुवात करण्यात आली अध्यापक वर्गाने ऑनलाइन तासाचे उत्तम व परिणामकारक केलेले नियोजन व विद्यार्थ्यांच्या निर्माण झालेले शिक्षण विषयक अभिरुची पाहून पालक वर्गाने संस्थेचे कौतुक केले.. या उपक्रमाबाबत काही पालकांनी पत्र लिहून व्हाट्सअप वर मेसेज पाठवून माननीय मुख्याध्यापिका ,उपमुख्याध्यापिका पर्यवेक्षक व सर्व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले, तर
सौ वाळकी व श्री सुरेश महाजन या पालकांनी शाळेत आभार पत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
गुगल
मिट , झूम अॅप, वर शिकवणाऱ्या अध्यापकांनी कृती पत्रिका तयार करणे, स्लाइड तयार करणे, प्रश्नपत्रिका, वस्तुनिष्ठ प्रश्नांची चाचणी तयार करणे. यासारखे संगणकीय व मोबाईलवर करावयाच्या कृती आत्मसात केल्या. ऑनलाइन अध्यापन -अध्यापन काळात शाळेतील सर्व अध्यापक 100% तंत्रस्नेही बनले.
कोल्हापूर
ऑनलाईन स्वाध्याय उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन सहभागी विद्यार्थ्यांची सर्वात जास्त संख्या असणारी शाळा म्हणून प्रशासकीय पातळीवर उषाराजे हायस्कूलला गौरवण्यात आले
विविध ऑनलाईन स्पर्धा बरोबरच एम.टी.एस ,एन.टी.एस . इयत्ता पाचवी , आठवी स्कॉलरशिप , व इयत्ता दहावी स्कॉलर बॅच यांच्या ऑनलाइन तासांचे स्वतंत्र वेळापत्रक राबविण्यात आले विशेप मार्गदर्शन वर्गाना मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आयोजित केले गेले .
शैक्षणिक
वर्षाची सुरुवात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजन झाले. लॉकडाऊन काळात नियमांचे पालन करून जयंती पुण्यतिथी कार्यक्रम योजले गेले काही अध्यापक ऑफलाईन तर काही ऑनलाईन या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहिले . या सहशालेय उपक्रमात विद्यार्थ्यांची जाणीव जागृती जपण्याचा प्रयत्न केला .या कार्यक्रमा दिवशी सुट्टी असेल तेव्हा त्याचे व्हिडिओ करून सर्व वर्गांच्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठवले व त्यामुळे विद्यार्थी व पालक या कार्यक्रमाशी जोडले गेले.
शालेय उपक्रमात अग्रेसर असणारे, तंत्रस्नेही ,आदर्श अध्यापन ,उपक्रमशील असणारे शिक्षक बंधू भगिनी यांना या दरम्यान अनेक संस्था संघटनांच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात
आले .शिक्षक आपल्या दारी ,ऑनलाईन अध्यापन, तंत्रस्नेही अध्यापककांचे विशेष अध्यापन वर्ग, मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन ऑनलाईन शिक्षण या उपक्रमात शाळेतील शिक्षकांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून योगदान, यूट्यूब चैनल वर विषय घटकांचे छोटे छोटे व्हिडिओ तयार करून अध्ययन-अध्यापन सुलभ करणारा अध्यापक वृंद कोरोना कालावधीतही संसर्ग टाळण्याकरता कोरोना योद्धा म्हणून कार्यरत होते शिवाय संस्था परिसरातील एका इमारतीमध्ये असलेल्या शासकीय विभागात बरेच अध्यापक बंधू सेवा बजावत होते सर्वेक्षणामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानात आमच्या अध्यापक जणू तुमचे
कुटुंब
आमची
जबाबदारी
या जाणिवेने सक्रिय होते
विद्यार्थिनींना करुणा संसर्ग होऊ नये याकरिता घ्यावयाची खबरदारी ,वापरायची साधने तसेच ती साधने तयार करण्याचे प्रशिक्षणही आमच्या अध्यापकांनी दिले थोडक्यात
कोरोनाच्या
महामारी च्या काळात सर्व शिक्षण क्षेत्र विविध समस्यांनी ग्रासलेले असताना या संकटावर मात करत *“अध्यापन खास ऑनलाईन तास” या उपक्रमातून शिक्षण बंद आहे हा नकारात्मक विचार विद्यार्थिनी व पालक यांच्या मनातून दूर करण्यास “ध्यास नव्या पर्वाचा कोरोनाकाळातही शिकण्या शिकवण्याचा”
या प्रयत्नांना ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलच्या सर्व घटकांनी एक संकुल म्हणून सर्वतोपरी सहकार्य केले व यशस्वी करून दाखवले याचा सार्थ अभिमान वाटतो.
शिक्षण
महर्षी कै डॉ .व्ही टी पाटील तथा काकाजी यांच्या स्त्री शिक्षणाच्या अविरत कार्यस या कालावधीतही खीळ बसली नाही ,त्यांनी सुरू केलेला हा ज्ञानयज्ञ या महामारीच्या काळातही प्रज्वलीत राहिला यात कै डॉ व्ही टी पाटील तथा काकाजी यांचा त्याग,पुण्याई तसेच संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉ क्रांतिकुमार पाटील यांचे आभाळा एवढे योगदान आहे.
तसेच या अभिनव उपक्रमास प्रोत्साहन देणाऱ्या व मार्गदर्शन करणाऱ्या तंत्रस्नेही मुख्याध्यापिका सौ ए.यू साठे . उपमुख्याध्यापिका एस .डी. चौधरी ,पर्यवेक्षक श्री एस. के. मिठारी, पर्यवेक्षिका सौ व्ही.डी जमेनीस व सर्व अध्यापक वृंद यांच्या प्रयत्नांना सलाम !
धन्यवाद.
तंत्रस्नेही अध्यापक वृंद





No comments:
Post a Comment