Transformation
of
Degrees of Comparison
in Marathi
मराठी मध्ये
in Marathi
मराठी मध्ये
दोन भिन्न गोष्टीतील किंवा नामातील एकच गुणांचा तुलनात्मक विचार करताना विशेषणाची भिन्न रुपे वापरावी लागतात.
इंग्रजीत एकूण तीन Degrees आहेत.
Positive Degree,
Comparative Degree,
Superlative Degree
1. Positive Degree-
विशेषणाच्या मूळ अरूपास समभाव दर्शक विशेषण
म्हणतात दोन भिन्न व्यक्ती मध्ये किंवा वस्तूंमध्ये एकच गुणधर्म सारख्या प्रमाणात असतो त्यावेळी त्याचा
अशा प्रकारचा समभाव व्यक्त
करताना 'as ----as' किंवा 'so---as' अशी रचना करून त्यामध्ये विशेषण असते
उदाहरणार्थ He is as fat as Mahesh.
2. Comparative Degree-
विशेषणाचे तर भावदर्शक रूपास C.D ( Comparative Degree) असे म्हणतात. एखादा विशिष्ट गुणएखाद्या
वस्तूमध्ये किंवा व्यक्ती मध्ये कमी-अधिक प्रमाणात आहे हे सांगण्यासाठी हा भाव वापरतात. यामध्ये विशेषणाला 'er' किंवा 'more' प्रत्यय लावून त्यानंतर than वापरावे.
उदाहरणार्थ- Raj is shorter than Mohan.
3) Superlative Degree-
विशेषणाच्या तम भावास S.D. (Superlative Degree) असे म्हणतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा वस्तू मध्ये
एखादा विशिष्ट गुणधर्म इतर वस्तूंपेक्षा जास्त आहे असे व्यक्त करावयाची असते त्यावेळी हा भाव योजतात यामध्ये विशेषणाला --est हा प्रत्यय लावलेला असतो अगर विशेषण आगोदर most असते. तसेच विशेषण अगोदर the हे उपपद ही असते. उदा.- Virat is the most popular player in India.
A) P.D. चे C.D.मध्ये रुपांतर करताना खालील नियम लक्षात घ्यावेत..
1) प्रथम as पुढील कर्त्याने वाक्य सुरू करावे.
2) योग्य ते क्रियापदाचे रूप वापरावे मात्र काळाचा बदल करू नये. 3) as___as किंवा so___as काढून टाकावे. 4) विशेषणाला __er प्रत्यय लावावा व त्यापुढे than वापरावे व सुरुवातीचा कर्ता लिहावा 5) क्वचितप्रसंगी अगोदर more वापरावे 6) P.D. मध्ये होकार असल्यास C.D. मध्ये नकार करावा व P.D. मध्ये नकार असल्यास C.D.मध्ये होकार करावे Examples- 1) Marathi is not so difficult as Science. - Science is more difficult than Marathi. 2) Ajay is not as tall as Amit. - Amit is taller than Ajay. 3) Rajesh is as clever as Laxman. - Laxman is not cleverer than Rajesh
B) C.D चे P.D मध्ये रूपांतर करताना खालील नियम लक्षात घ्यावेत.
1) प्रथम than पुढील शब्दांनी वाक्य सुरू करावे.
2) योग्य ते सहकार्य क्रियापद घ्यावे.
3) as___as किंवा so __as चा वापर करावा व
मूळ विशेषण लिहावे.
4 ) C.D. मध्ये होकार असल्यास P.D.मध्ये नकार करावा व
C.D.मध्ये नकार असल्यास P.D मध्ये होकर करावा।
5 ) than,__er प्रत्यय अगर more काढून टाकावे.
Examples-
1) Mukesh is richer than me.
- I am not as rich as Mukesh.
2) The rock is harder than the brick.
-The brick is not as hard as the rock
C) S.D. चे P.D. मध्ये रूपांतर करताना खालील नियम लक्षात घ्यावेत.
1) वाक्याच्या सुरुवातीस No other हे शब्द लिहावेत.
2) त्याच्यापुढे Superlative रूपा पुढील भाग लिहावा.
3) नंतर सहाय्यकारी क्रियापदे वापरावे.
4) as___as लिहून त्या मध्ये मूळ विशेषण लिहावे.
5) शेवटी मूळ वाक्यातील कर्ता as पुढे लिहावा.
6) the हे उपपद __est हा प्रत्यय किंवा most काढून टाकावे.
Examples-
1) Leena is the fittest girl in the class.
- No other girl in the class is as tall as Leena.
2) Mount Everest is the highest peak in the world.
- No other peak in the world is as high as Mount Everest.
3) Mother Teresa is the greatest social worker.
- No other social worker is as great as Mother Teresa.
D) SD che CD मध्ये रुपांतर करताना खालील नियम लक्षात घ्यावेत.
1) वाक्याची सुरुवात दिलेल्या वाक्याचा कर्त्यानेच करावी.
2) the हे उपपद __est हा प्रत्यय किंवा most काढून टाकावे व विशेषणांला er किंवा more हा प्रत्यय लावावा.
3) विशेषनानंतर than वापरावे.
4) than नंतर any other हे शब्द लिहावेत व शेवटी वाक्याचा उरलेला भाग लिहावा.
कर्ता + क्रियापद + विशेषण + er + than any other +कर्ता. या सूत्राप्रमाणे S.D. चे CD करावे.
Examples -
1) Tiger is the strongest animal in the forest.
- Tiger is stronger than any other animals in the forest.
2) That was the best news.
- That was better than any other news.
3) The Everest is the highest peak.
- The Everest is higher than any other peak.
4) Shivaji was the greatest King.
- Shivaji was greater than any other king.
E) SD च्या वाक्यात One of the असल्यास
PD करताना खालील नियम लक्षात घ्यावेत.
जर SD मध्ये One of the + विशेषणात est प्रत्यय
असेल तर PD करताना पुढील नियम ध्यानात घ्यावेत.
1) वाक्याची सुरुवात Very few ने करावी.
2) नंतर विशेषणाचा पुढचा भाग लिहावा. 3) योग्य ते सहकारी क्रियापद वापरावे. 4) as___as ची रचना करून मूळ विशेषण लिहावे व शेवटी पहिला कर्ता लिहावा.
Examples
1) Vaibhavi is one of the cleverest girls in the class. - Very few girls in the class are as clever as Vaibhavi. 2) He was one of the happiest people in his town. - Very few people in his town were as happy as he F) SD चा वाक्यात one of the आल्यास CD करताना पुढील नियम लक्षात घ्यावेत. जर SD मध्ये one of the + मूळ विशेषण + est प्रत्यय असेल तर त्याची CD करताना पुढील नियम वापरावेत.
1) प्रथम सुरुवातीचा करता लिहावा.
2) सहकारी क्रियापद वापरावे. the, one of the काढून टाकावे व विशेषणला __er प्रत्यय लावावा 3) नंतर than वापरावे. 4) त्यानंतर many other हे शब्द लिहावेत व वाक्य जसेच्या तसे लिहावे.
Examples-
1)Vaibhavi is one of the cleverest girls in the class. -Vaibhavi is cleverer than any other girls in the class. 2) Kolhapur is one of the best cities in Maharashtra. - Kolhapur is better than many other cities in Maharashtra. 3) Water is one of the most essential factors in building and maintaining health. - Water is more essential than many other factors in building and maintaining health. |
NIce
ReplyDeleteVery nice,sirji
ReplyDeletePlease write in English all these things it will be helpful to all medium students and teachers
ReplyDeleteI will do this soon
Deletevery nice and helpful for all.👌👍
ReplyDeleteThank You Madam.....
Delete